भुसावळात टेंट व्यावसायिकांवर लॉकडाऊनचे सावट; उपासमारीची वेळ; १ मे रोजी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा –


भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या राज्यात कोरोनाचा स प्रादुर्भाव वाढीस लागत असल्याने राज्य सरकारने लोकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे काही छोट्या व्यावसायिकांना अनुदान जाहीर केले. यात मात्र टेंट व्यावसायिकांना कुठलीही मदत दिली नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या टेंट व्यावसायिकांना विशेष पॅकेज जाहीर करावे अन्यथा, कामगार दिनी अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात टेंट व्यावसायिकांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने याना आज निवेदन दिले. यात नमूद करण्यात आले की, कोविड – १९ चा मुकाबला करण्यासाठी मागील वर्षी मार्च मध्ये लागू करण्यात आलेला लॉक डाऊन हा लग्न समारंभात काम करणाच्या टेन्ट हाउस, बॅजो व कॅन्टीन कामगारसह मालकांवर फारमोठा आघात करणारा ठरला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरून सर्व आपल्या रोजगारांच्या प्रतीक्षेत असताना परत लॉक डाउन लागल्याने दुसऱ्या कोविड लाटेत महाराष्ट्र शासनाने कोणतेही आर्थिक पॅकेज ची घोषणा नाकारली. आम्हाला सर्वांना उघड्यावर टाकून बेवारस सोडले आहे. शासनाने त्वरीत टेंट व्यावसायिकांना निर्वाह भत्त्यासह विशेष पँकेजची व्यवस्था करावी अन्यथा १ मे २०२१ रोजी कामगार दिनी शासकीय ध्वजारोहण प्रसंगी अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर किशोर भालेराव, प्रवीण माळी, किरण मिस्तरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *