भुसावळात श्री गणेश कॉम्प्युटर्स तर्फे नागरिकांच्या सोयीसाठी विनामूल्य आधार अपडेट ;

भुसावळ(प्रतिनिधी )-
येथील श्री गणेश कॉम्प्युटर्स येथे खास कोरोंनाच्य पार्श्वभूमीवर आधार अपडेट केंद्र मराठी नवीन वर्षाच्या सुरवातीला गुढीपाडवा निमित्त माजी नगरसेवक दिपक धांडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी माजी सैनिक प्रमोद वानखेडे,पवन गालफाडे,आकाश ढाके, आकाश कोळी,आरोग्य सेविका वैशाली सुतार, आरोग्य सेवक कोमल नेरकर, रमण इंगळे,श्री गणेश कॉम्प्युटर्स चे संचालक अमोल माळी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या सेवेसाठी विनामूल्य आधार अपडेट करून देण्यात आले, तसेच येणार्‍या आठ ते दहा दिवसांसाठी विनामूल्य आधार अपडेट करून दिले जाईल. तसेच कोविड लसीकरणाच्या नोंदणी नागरिकांना मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन श्री गणेश कॉम्प्युटर्स चे संचालक अमोल माळी यांनी केले आहे.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील श्री गणेश कॉम्प्युटर्स येथे मोफत आधार लिंक करून देताना अमोल माळी सोबत दिपक धांडे,पवन गालफाडे,आकाश ढाके, आरोग्य सेविका वैशाली सुतार आदि.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *