भुसावळ (प्रतिनिधी )-
जय झूलेलाल मंदिर भुसावळ येथे शनिवारी 10 एप्रिल रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सिंधी भाषा दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
यावेळी किशोर कराडा, अमर जगिया, नारायणदास छाबरा, राजाराम बजाज, युवा नेतेअनिल कुमार चांदवाणी आणि दीपक कुमार चांदवाणी उपस्थित होते. दीपककुमार चांदवाणी यांनी मनोगत व्यक्त करीत सिंधी भाषेची महती व माहिती सोदाहरण विषद केली .
कोरोना साथीच्या आजारामुळे हा दिवस साधेपणाच्या रूपात साजरा करण्यात आला.



