भुसावळ (प्रतिनिधी )-
1) सोलापूर आणि गुवाहाटी दरम्यान विशेष अतिरिक्त गाड्या
01303 विशेष दि.१२.४.२०२१ ते २६.४.२०२१ (३ फे-या) पर्यंत सोलापूर येथून दर सोमवारी १७.३० वाजता सुटेल आणि गुवाहाटी येथे चौथ्या दिवशी ००.३० वाजता पोहोचेल.
01304 विशेष दि.१६.४.२०२१ ते ३०.४.२०२१ (३ फे-या) पर्यंत गुवाहाटी येथून दर शुक्रवारी ०५.३० वाजता सुटेल व सोलापूरला तिसर्या दिवशी ०७.५५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड, पुणे, पनवेल, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, पाटलीपुत्र, बरौनी जंक्शन, कटिहार, किशनगंज, न्यू जलपाईगुडी, न्यू कूचबिहार, न्यू बोंगाईगांव, रंगिया जंक्शन.
संरचना : २ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, १७ द्वितीय आसन श्रेणी.
2) पुणे-गोरखपूर विशेष ट्रेन
01425 विशेष दि. ११.४.२०२१ रोजी पुणे येथून २२.०० वाजता सुटेल व गोरखपूरला तिसर्या दिवशी ०६.३५ वाजता पोहोचेल.
01426 विशेष गोरखपूर येथून १३.४.२०२१ रोजी २१.१५ वाजता सुटेल व पुणे येथे तिसर्या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर, लखनऊ, गोंडा, बस्ती.
संरचना : २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ९ द्वितीय आसन श्रेणी.
3)मुंबई आणि गोरखपूर दरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वे
01049 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.४.२०२१ रोजी ०६.३५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी गोरखपूरला १८.४० वाजता पोहोचेल.
01050 विशेष गोरखपूर येथून १४.४.२०२१ रोजी सकाळी ०८.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी २२.३० वाजता पोहोचेल.
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन., जांघाई, भदोही, वाराणसी जंक्शन, मऊ, भटणी, देवरिया सदर.
संरचना : २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ९ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : या संपूर्णतः आरक्षित 01303,01425, 01049/01050 विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग ११.४.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.



