भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आणि रुग्णांच्या विलगीकरणाची आवश्यकता पाहता भुसावळ शहरात केशवस्मृती प्रतिष्ठान च्या वतीने कोवीड रुग्ण विलगीकरण कक्ष दिनांक ११/०४/२०२१ रविवार पासून शासकीय आय.टि.आय , साईबाबा मंदिर जवळ , जामनेर रोड भुसावळ येथे सुरु करण्यात येत आहे.
या विलगीकरण कक्षात प्रसन्न वातावरणात विविध योगासन आणि बौद्धिक खेळांसह तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन ही लाभणार आहे.
विलगीकरणाचे शुल्क हे प्रति व्यक्ती प्रति दिवस रु.७५०/- या अत्यल्प दरात असून यात रुग्णांना दोन वेळचा चहा , एक वेळ नाश्ता , दोन वेळचे भोजन , रात्री हळदीचे दुध असा आहारही देण्यात येईल.
रुग्णांनी सोबत आणावयाचे सामानाची यादी –
ब्रश,टूथपेस्ट,तेल,कंगवा,साबण(सोपकेस सह)

*टॉवेल , नॕपकीन, कपडे
*जेवणासाठी ताट ,वाटी, दोन चमचे ,प्याला व बॉटल
*योगासाठी चादर
*अंथरूणावर टाकण्यासाठी आणि पांघरण्यासाठी चादर
*मोबाईल व चार्जर
*वाचण्यासाठी पुस्तके (आपल्या गरजेनुसार )
*रोज ईतर कारणांसाठी लागत असलेली औषधी
*आधार कार्डची झेरॉक्स
*रुग्णांनी स्वतःसाठी सॕनिटायझर आणि मास्क सोबत आणावे.
तरी ज्याही रुग्णांना या विलगीकरणाचा लाभ घ्यावयाचा असेल अशांनी १) श्री.केदार ओक - ९४२२७८१३७५
२)श्री.प्रविण कुलकर्णी – ७५८८८१४६३६
यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन आयोजकांनीं केले आहे .


