ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी विनोदकुमार सावळे यांची निवड ;


बुलडाणा (प्रतिनिधी ):

बुलढाणा जिल्हयातील सामाजिक क्षेत्रात नावलौकिक सोबतच १५ वर्षापासुन महाराष्ट्रामध्ये
विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांच्या माध्यामातुन आपल्या कामाचा ठसा उमटविणारे
विनोदकुमार सावळे यांची केंद्र शासनानी मान्यता असलेल्या ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या द्वारे उपध्यक्ष संदीप जाधव.महासचिव राजेश आंधळे यांचे सहमतीने ऑनलाईन निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
या निवडीबदल विविध ठिकाणाहून अनेकांनी सावळे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस
शुभेच्छा दिल्या आहे. विनोदकुमार शिवाजी सावळे हे मोताळा तालुक्यातील वडगाव (खं ) येथिल रहीवासी
असुन ऐका छोटयाश्या खेड्यातील असुन अत्यंत खडतर परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले असुन त्यांनी
बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेला असून त्यांनी महाराष्ट्रामध्ये
गेल्या १५ वर्षापासून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थामध्ये आरोग्य शिक्षण व ग्रामीण
विकासाच्या कामात आपला ठसा उमटविल्याने त्यांची नियुक्ती झाल्याचे सावळे यांनी सांगितले आहे.
सदर नियुक्तीसाठी नाशिक येथील आधार आश्रमच्या अधिक्षिका
गिताताई गायकवाड यांचे मोलाचे
मार्गदर्शन मिळाले सावळे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *