भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनातर्फे 45 वर्ष व 45 वर्षावरील सर्वांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याकरिता शासनातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. या लसीकरण संदर्भात जनतेमध्ये असलेल्या संभ्रम आणि भीती आणि अफवा आणि शंकांचे निरसन सुद्धा शासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. आणि या शासनाच्या हाकेला ओ देत जनतेकडून चांगल्या प्रतीचा त्या लसीकरण मोहिमेला मिळत आहे. मात्र अशातच भुसावळ शहरातील पालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणासाठी आलेल्यांना रॅपिड चाचणीची सक्ती केली जाते त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातून अनेक लाभार्थी या रॅपिड एंटीजन टेस्टच्या भीती पोटी लसीकरणा विना माघारी जात आहेत. लसीकरणा पूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक नाही.

भुसावळ शहरांमध्ये चार खाजगी हॉस्पिटल्स वर्षात शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे यात शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी गेलेल्या रुग्णांना प्रथम रॅपिड अँटीजन टेस्ट करावी लागत आहे ही टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच लसीकरण केले जात आहे. एकीकडे लसीची परिणामकारकता वाढावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य कर्मचारी सांगतात. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा लक्षणे असलेल्यांची चाचणी करून लस देणे संयुक्तिक आहे मात्र ज्यांना लक्षणं नाहीत त्यांनाही आणि जनतेची सक्ती केली जात आहे परिणामी अनेक लाभार्थी माघारी फिरत आहेत त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण कमी होऊन परत जनतेमध्ये याबाबत संभ्रम निर्माण होत आहे आणि भीतीचे वातावरण आहे. यामुळे पुन्हा जनतेमध्ये याबाबत जनजागृती करणे कठीण जाईल. म्हणून या लसीकरणाच्या पूर्वी सक्तीची होणारी रॅपिड अँटी जन टेस्ट साठी ची सक्ती रद्द करावी. अशी मागणी साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेेेश टोपे , व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे.


