छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेतर्फे शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व मास्क वाटप


भुसावळ (प्रतिनिधी ) –
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन मंगळवार रोजी येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वंजारी तांडा, भिलमळी परिसरात शालेय विद्यार्थांना शैक्षणीक साहित्य यात वह्या,पेन,पेन्सिल,रबर,पाऊच व मास्क शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे पालन करून वाटप करण्यात आले.
यावेळी शिकाल तर टिकाल स्पर्धेच्या युगात शिक्षणा शिवाय पर्याय नाही मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी त्यांनी नियमित शाळेत जावे, यासह शिक्षणाचे महत्व व फायदे याबाबत संस्थेच्याअध्यक्षा सौ राजश्री नेवे यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच शिवाजी राजे यांचे शौर्य व धाडसी कर्तुत्वाने गाजलेल्या बालकथा सांगीतल्या .
सध्या कोविड१९ मुळे घरूनच अभ्यास सुरु आहे, नियमित व वेळेवर अभ्यास करा , चांगल्या सवयी, स्वच्छते चे नियम, चांगले संस्कार व एक चांगले व आदर्शयुक्त व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर आपणास शाळेत जावे लागेल व अभ्यास हा करावाच लागेल, शाळेत जाण्याने आपले राहणीमान सुधारेल, आपण सुरक्षित व सुशिक्षित होण्यासाठी नियमित शाळेत जा अभ्यास करा, असा मौलिक सल्ला देखिल संस्था अध्यक्षा सौ.राजश्री नेवे यांनी विद्यार्थांशी बोलतांना दिला .
कार्यक्रमाला मंदाकिनी केदारे, स्मिता माहुरकर, माया चौधरी, वंदना झांबरे यांचेसह संस्थेचे अन्य पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद शिक्षिका प्रिती आंबादे आदी महिला उपस्थित होत्या .कार्यक्रम यशस्वितेसाठी रमेश पवार पोलिस पाटील,
बाबुराव पवार
जिल्हा परिषद शिक्षिका प्रिती अंबादे,अमोल साबळे, सदाशिव ससे, निलेश फंड, चंद्रकांत नाटकर, उमेश नेवे, क्रिषी नेवे ,निलेश नेवे ,
सरस्वती मित्र परिवार
यांचे अनमोल सहकार्य लाभले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *