भुसावळ (प्रतिनिधी )-
माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांच्या नावाने बनावट फेक अकाऊंट तयार करण्यात आले असून संशयीत या अकाऊंटवरील पैशांची मागणी करीत असून मित्र परीवार व हितचिंतकांनी या अकाऊंटवरून येणार्या मेसेजला प्रतिसाद देवू नये, असे आवाहन चौधरी यांनी केले आहे.
काही घाणेरड्या प्रवृत्तीच्या लोकांनी माझी प्रतिमा बदनाम करण्याच्या हेतून फेसबुकच फेक अकाउंट बनवले असून अकाउंटवर पैशांची मागणी केली जात आहे. सर्व मित्र परीवार व हितचिंतकांनी या फेक अकाउंटवरून काही चुकीचे पोस्ट आली तर आपण दुर्लक्ष करावे व या अकाऊंटला ब्लॉक करावे, असे आवाहन चौधरी यांनी केले आहे.



