भुसावळ (प्रतिनिधी )-

येथील पंचायत समिती सभागृहात दि. 18 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11. 30 वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्कर्स फेडरेशन व राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे पत्रकारिता काल आणि आज या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. तसेच भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दै. देशोन्नतीचे मुख्य उपसंपादक प्रेम परदेशी यांचा जाहीर सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहिष्कृत मजदूरचे संपादक अरुण दामोदर तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी व अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित राहतील. वक्ते म्हणून साहित्यिक व चळवळीतील विचारवंत जयसिंग वाघ आहेत. प्रमुख उपस्थिती अॅड. नितीन खरे, नायब तहसीलदार शशिकांत इंगळे, पत्रकारीकेतील अभ्यासातश्रीकांत जोशी, वरिष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी, सलाउद्दीन अदिब, कामगार नेते जे. एस. वराडे, पत्रकार गणेश वाघ यांची राहील. उपस्थितीचे आवाहन श्याम कुमार वासनिक, शांताराम जाधव, ईश्वर खंडारे ,भगवान निरभवणे ,वर्कर्स फेडरेशन झोन सचिव भरत पाटील, अध्यक्ष तेजराव नाईक ,अनिस महिला प्रतिनिधी अंजना निरभवणे, सागर बहिरुणे ,राजेश तायडे, राष्ट्रवादी ट्रेड युनियन अध्यक्ष कैलास झोपे, प्रा.सोपान बोराटे ,नरेश वाघ ,सुमंगल अहिरे , अशोक शिंदे, सुरेश गणवीर , शशिकांत रायमुळे, राहुल कुचेकरआदी आयोजकांनी केले आहे.


