भुसावळात वैतागवाडीत छापा : पाच आंबटशौकीनांसह 5 महिला पोलिसांच्या ताब्यात ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील वैतागवाडी परिसरात पोलिसांनी रविवारी रात्री अचानक छापा टाकून पाच आंबट शौकीनांसह ५ महिलांना ताब्यात घेतले. यामुळे वैतागवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिस ठाण्यात पीटा अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचारी, शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी, तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी अचानक वैतागवाडीत छापा टाकला, यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. वैतागवाडी परिसरात पोलीस आल्याने तेथे एकच धावपळ उडाली याच दरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी वैतागवाडी परिसरात केलेल्या कारवाईत सहा आंबट शौकीनांसह पाच महिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वैतागवाडी परिसरात केलेल्या कारवाई प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पीटाअँक्ट नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *