क्रीकेटपटूंना वेध सरपंच चषकाचे ; सातवा सरपंच चषक पटकविण्यासाठी खेळाडूंचा कसून सराव ; साकेगावात २७ फेब्रुवारी पासून स्पर्धेला होणार सुरुवात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-

ग्रामपंचायत साकेगाव जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना व मॉर्निंग सीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी २५० पेक्षा जास्त खेळाडूंनी कसून सराव सुरू केला असून सरपंच चषक आपल्या संघाने जिंकावा यासाठी मोर्चेबांधणी करीत आहे. स्पर्धेला २७ फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे
आरोग्य सुदृढ व्हावे गावाच्या खेळाडूंचे नाव राज्य, राष्ट्रीय स्तरावर लौकिक व्हावे युवकांनी निर्व्यसनी राहावे, मोबाईलचा कमी वापर करून मैदानी खेळाकडे वळावे यासाठी ग्रामपंचायत व जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे, यात गावातील २८ संघाचा समावेश असतो या स्पर्धेनिमित्त नोकरी-व्यवसायासाठी देशात व परदेशात गेलेल्या खेळाडू रजा टाकून स्पर्धेचा आनंद व सहभाग घेण्यासाठी गावात येतात यामध्ये रेल्वे कर्मचारी, पोलीस, डॉक्टर व्यावसायिक अशा खेळाडूंचा समावेश असतो या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की जो संघ सरपंच चषक स्पर्धा जिंकतो त्याची सवाद्य गावातून मिरवणूक काढून वर्षभरासाठी फोटो ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येतो याशिवाय विजयी संघाला व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना रोख बक्षिसे व चषक देण्यात येतो.

मैदानाच्या तयारीला वेग

२७ फेब्रुवारी पासून स्पर्धेला सुरुवात होत असून यासाठी प्रत्येक संघाला कलर कोट दिलेला असून स्पर्धे तयारीसाठी सकाळी खेळाडू मैदान व पिच तयार करण्यासाठी मेहनत घेत आहे ,याशिवाय आपल्या संघाने हे चषक पटवावे यासाठी कसून सराव सुद्धा करत आहे

एकाही संघाने दोन वेळा सरपंच चषक पटकाविले नाही

गेल्या सहा वर्षापासून आयोजित या स्पर्धेमध्ये आज पर्यंत एकाही संघाला सलग दोन वेळा किंवा सहा वर्षात दोन वेळा चषक जिंकता आले नाही हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असून दरवर्षी नवीन संघ सरपंच चषका वर आपले नाव कोरत असतो,, यावर्षी सुद्धा नवीन संघ चषकावर नाव कोरले कि गतविजेत्या संघला पुन्हा चषकावर नाव कोरेल हे लवकरच समजणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *