भुसावळ विभागात 65 वा रेल सप्ताह समारोह संपन्न ;डीआरएम यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोख पुरस्कार देऊन सन्मानित ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ विभागा मध्ये दिनांक 5 रोजी 65 वा रेल सप्ताह समारोह संपन्न झाला.त्यामध्ये भुसावळ विभागातील जवळच्या स्टेशनचे कर्मचारी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. दिनांक 12.रोजी मध्य रेल्वे भुसावळ विभागातील भुसावळ सोडून अन्य स्टेशनच्या 67 कर्मचारी तसेच 4 ग्रुप अवार्ड मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांचे तर्फे व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे रेल्वे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना अकोला,बडनेरा,
खंडवा,मनमाड,नाशिक स्टेशन येथे प्रशस्तीपत्र व रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भुसावळच्या 16 कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या समारंभाचे सूत्रसंचालन आर एच परदेसी, सहाय्यक कार्मिक अधिकारी यांनी केले.तर एन डी गांगुर्डे वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी यांनी रेल सप्ताह आयोजित करण्याचे उद्देश कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना केले.
या कार्यक्रमात अप्पर मंडळ रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा,वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे , वडनेरे,रामटेके,परदेशी सहाय्यक कार्मिक अधिकारी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन बी एस रामटेके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *