भुसावळ (प्रतिनिधी )-
जागतिक सुर्यनमस्कार दिन व
रथसप्तमीच्या शुभमुहूर्तावर 19 फेब्रुवारी, शुक्रवार रोजी
एक दिवस फक्त माझ्या आरोग्यासाठी या उपक्रमातर्गत येथील प्रतिष्ठा महीला मंडळ , अद्वैतानंद योगा अँड फिटनेस स्टुडीओ ,दि आर्ट ऑफ लिव्हींग ,भुसावळ यांचेतर्फे संतोषी माता हाॅल, मातृभूमी चौक,येथे सकाळी ६.३० ते ८ वाजेदरम्यान जागतिक सुर्यनमस्कार दिन
साजरा करण्यात येत आहे. कुटुंबातील सदस्यांची नियमित काळजी घेणाऱ्या महिलांनी स्वतःच्या आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे या उद्देशाने फक्त महिलांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाच्या प्रमुुुख वक्त्या म्हणून डॉ.सौ मृणाल पाटील तर डॉ. सौ सुजता केळकर ,डॉ.सौ नीलिमा नेहते या मार्गदर्शन करणार आहे . सदर उपक्रमात
सहभागी होणाऱ्या महिलांना प्रवेश निःशुल्क आहे. परंतु यासाठी पुर्व नावनोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करीता प्रा. वैद्या सीमा देवेन्द्र 7756042375, सौ किरण जावळे 9823054433 , स्नेहा जैन 7841026644 , अनिता आंबेकर 7304434949 ,
अर्चना सोनवणे 9702174190 ,प्रियंका चौधरी 07620839789 यांचेकडे संपर्क साधावा .तसेच
सर्वानी आपली योगा मॅट/ सतरंजी, मास्क,नॅपकीन, पाण्याची बाॅटल सोबत आणावी.तरी सर्व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे .



