भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेने यापूर्वी निवडक अशा विशेष गाड्यांमध्ये तिकिट बुकिंगसाठी आगाऊ आरक्षण कालावधी (अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड-एआरपी) म्हणून 10 दिवसांची घोषणा केली होती. परंतु आता दिनांक 10.02.2021 पासून खाली निर्देशित गाड्यांसाठी हा कालावधी 120 दिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अ) 07415 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-तिरुपती विशेष
ब) 07618 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – हजुर साहिब नांदेड विशेष
क) 02729 पुणे-हजूर साहिब नांदेड विशेष
ड) 02236 लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद विशेष
इ) 07613 पनवेल-हजुर साहिब नांदेड विशेष
फ) 02766 अमरावती-तिरुपती उत्सव विशेष
120 दिवसांच्या अॅडव्हान्स आरक्षण कालावधीसह वरील सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग दिनांक 10.02.2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेत स्थळावर सुरु होईल.



