लोकमान्य टिळक टर्मिनस लखनऊ प्रयागराज दरम्यान विशेष उत्सव गाडया ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ आणि प्रयागराज दरम्यान उत्सवासाठी विशेष उत्सव गाडया चालविणार आहे. तपशील खाली दिलेल्या माहितीनुसार:
१) लोकमान्य टिळक टर्मिनस -लखनऊ उत्सव विशेष गाडी ( 20 फेरी )
*गाडी क्रमांक 02107 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस -लखनऊ उत्सव विशेष गाडी हि दिनांक 16.12.2020 ते दिनांक 30.01.2021 पर्यंत दर सोमवार ,बुधवार शनिवार ला प्रस्थान स्टेशन हून 16.25 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी लखनऊ स्टेशन 15.30 वाजता पोहचेल .

  • गाडी क्रमांक – 02108 अप लखनऊ लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडी हि दिनांक 17.12.2020 ते दिनांक 31.01.2021 पर्यंत दर मंगळवार ,गुरुवार ,रविवार ला प्रस्थान स्टेशन हून 22.45 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन 21.50 वाजता पोहचेल
    हाल्ट: ठाणे, कल्याण, नासिक रोड, भुसावल, भोपाल, ललितपुर, झाँसी, ओरा, कानपुर सेंट्रल
    संरचना : 1 एसी -2 टीयर, 4 एसी -3 टीयर, 12 स्लीपर क्लास, 3 सेकंड क्लास सीटिंग।
    २) लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज AC उत्सव विशेष गाडी ( 07 फेरी )
    *गाडी क्रमांक 02153 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज उत्सव विशेष गाडी हि दिनांक 15.12.2020 ते दिनांक 26.01.2021 पर्यंत दर मंगळवार ला प्रस्थान स्टेशन हून 16.30 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी प्रयागराज स्टेशन 16.40 वाजता पोहचेल
  • गाडी क्रमांक – 02154 अप प्रयागराज लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडी हि दिनांक 16 .12.2020 ते दिनांक 26.01.2021 पर्यंत दर बुधवार ला प्रस्थान स्टेशन हून 19.00 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन 16.15 वाजता पोहचेल
    हाल्ट: कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावल, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, जबलपुर, कटनी, मैहर,सतना
    संरचना: 1फर्स्ट एसी, 4 एसी -2 टीयर, 13 एसी -3 टीयर, एक पैंट्री कार।
    आरक्षण : पूर्णतः आरक्षित उत्सव विशेष गाड्या क्र. 02107 व 02153 आणि पूर्णतः आरक्षित विशेष गाडी
    विशेष शुल्कासह बुकींग दि. 13.12.2020 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
    या उत्सव विशेष गाड्या व विशेष गाड्यांच्या स्थानकांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी
    www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा
    केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी
    देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *