भुसावळ (प्रतिनिधी )-
जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर रोडवरील राष्ट्रवादीचे शहराध्यक्षांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.
प्रसंगी मतदार नोंदणीबाबत जनजागृती करणार्या हॅण्डबिलाचेही प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे व नगरसेविका मीनाक्षी धांडे यांनी अॅड.खडसे यांचे बुके देवून स्वागत केले .
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते देवा वाणी, मनिष पाचपांडे, दिनेश भंगाळे, सुमित बर्हाटे, अजय येवले, ललित भंगाळे, भूषण भंगाळे, राकेश चौधरी, यतीन पाटील, हर्षल वाणी, विशाल भंगाळे, राहुल धांडे, सदानंद वराडे, निलेश भारंबे आदींची उपस्थिती होती.



