हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ बहुजन वंचित आघाडीतर्फे भुसावळात जोरदार निदर्शने ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय दलित युतीवर चार नराधमांनी अमानवीय अत्याचार केला .पिडीत युवती दिल्ली येथील सफरजंग हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी लढा देत असताना २९ सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली . या घटनेच्या निषेधार्थ भुसावळ येथे यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करीत उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करण्यात आला .
अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशी द्यावी असे मागणी आंदोलकांनी तर्फे करण्यात आली .
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी मनीषा वाल्मिकी या १९ वर्षीय दलित युवतीवर लवकुश ठाकुर , रवीसिंग ठाकूर , राम कुमार ठाकुर संदीप ठाकूर या चार नराधमांनी अमानुषपणे समजिक बलात्कार केला एवढ्यावरच न थांबता पुढे तिची जीभ कापून तिच्या मानेचा कणा मोडून हात-पाय तोडले ज्योती दिल्ली येथील सफर जंग हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना 29 सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली या घटनेने यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे या चारही नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसाठी भुसावळ येथे बहुजन वंचित आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *