भुसावळ (प्रतिनिधी )-
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील झालेल्या अमानुष घटनेतील मयत मनिषा वाल्मिकी हिच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भेटण्यास जात असतांना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकार पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली.या घ घटनेच्या निषेध कॉॉग्रेस कमेटी,अनु.जाती विभागाच्या वतीने केला असून उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधार्थ तहसिलदार यांना गुरुवार रोजी निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यक्रम समन्वयक व किसान विरोधी विधेयकाचे नाशिक जिल्ह्याचे निरीक्षक योगेंद्र पाटील,जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, उपाध्यक्ष ईस्माइल गवळी,काँग्रेस असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बारसे, तालुकाध्यक्ष अँड.रम्मु पटेल, शहराध्यक्ष अँड.शरद तायडे,विक्रम वानखेडे,कुणाल सुरळकर,विशाल गायकवाड, जावेदभाई,गफुर गवळी, तस्लिम खान,महेबुब खान तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



