भुसावळात न्हावी येथील इसमाची तापी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या ;


भुसावळ (प्रतिनिधी) –
यावल तालुक्यातील न्हावी येथील कोळी वाडा भागातील चाळीस वर्षीय इसमाने तापी नदीच्या पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना आज १ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
विरेंद्र रामा कोळी, वय ४०, रा. कोळी वाडा, न्हावी ता. यावल येथील इसमाने आज १ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास भुसावळातील तापी नदीच्या पुलावरुन उडी घेवून आत्महत्या केली. तापी नदी पुलावर मोटार सायकल आढळून आली. तापी नदी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या का केली याबाबतचे कारण गुलदस्त्यात आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला. याबाबत मयताचा भाचा धनराज मंगल कोळी याने खबर दिल्यावरुन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ. मोहम्मद अली सय्यद हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *