भुसावळ (प्रतिनिधी )-
रोटरी क्लब ऑफ भुसावळ आणि रेल्वेच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी डी. आर. एम. विवेक गुप्ता आणि ए डी आर एम मनोज सिन्हा.व रोटरीचे अध्यक्ष गजानन ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
बुधवार रोजी सकाळी दहा वाजता भुसावळ रेल्वे स्टेशनाच्या दक्षिण बाजूच्या फिरत्या क्षेत्रा जवळील बागेत भुसावळ डिव्हिजनचे डी. आर. एम. विवेक गुप्ता, ए. डी .आर .एम .मनोज सिन्हा सीनियर डी. एम .ई. लक्ष्मीनारायण, सीनियर डी. एस. ओ. एन के अग्रवाल व रोटरी क्लब ऑफ भुसावळचे प्रेसिडेंट गजानन ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने स्वच्छता अभियान सप्ताह 2020. च्या अंतर्गत रेल्वे प्रशासन व रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा रुक्षा रोपणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
या कार्यक्रमाचे नियोजन स्टेशन डायरेक्टर गोपीनाथ अय्यर यांनी केले होते. याप्रसंगी रेल्वेचे ए.डी.एम ई. शेख असलम जावेद, युनूस अन्सारी, स्टेशन सेक्शन इंजिनिअर आर एन देशपांडे , सी एच आय जोयदीप रॉय व एस एम मनोज श्रीवास्तव हे उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्याकडून रोटेरियन राधेश्याम लाहोटी, सतीश अग्रवाल, गोपाळ तिवारी, हेमंत नाईक, राजेंद्र कुमार फेगडे, श्री महेश भराडे, विकास कात्यायानी, राजेश जोशी, प्रकाश ठाकूर, बोधराज चौधरी, मदन बोरकर, गोपीनाथ अय्यर,रोटरीचे अध्यक्ष गजानन ठाकूर व मनोज गुलईकर हे उपस्थित होते.



