भुसावळ (प्रतिनिधी ) –
आज २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निम्मित्त गांधी पुतळा,जळगाव रोड, भुसावळ येथे सकाळी ९ वाजता’ भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, खा.रक्षाताई खडसे, आ.संजय सावकारे, नगराध्यक्ष मा.रमण भोळे,प्रा.सुनील नेवे यांच्या उपस्थितीत स्व.महात्मा गांधी जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. प्रसंगी महात्मा गांधी यांना अभिवादन करुन ‘महात्मा गांधी पुतळा परिसर ते शहर पोलीस स्टेशन परिसर’ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, व विविध आघाड्या,युवा मोर्चा पदाधिकारी यांनी कोरोना पार्श्वभुमीवर सर्व नियमांचे पालन करुन सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे शहर सरचिटणीस पवन बुंदेल आणि अमोल महाजन यांनी केले आहे.



