पिंपळगाव बुद्रुक येथे कोरोनाविषाणू शिरकाव प्रशासकांनी गावाची केली पाहणी ;


वरणगाव (प्रतिनिधी)
तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे भुसावळ येथील महिलेला त्रास होत असल्याने जळगाव येथील सिविल हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्या होत्या त्यांची टेस्ट घेतली असता ती गुरुवार रोजी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग ग्रामपंचायत प्रशासन यांनी गावाचे सर्वेक्षण करून तात्काळ उपाययोजना केल्या
पिंपळगाव बुद्रुक तालुका भुसावळ येथे गेल्या अनेक दिवसांपासून कोरणा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या यामुळे गावामध्ये कोरोनाविषाणू चा शिरकाव झालेला नव्हता परंतु 52 वर्षीय महिलेला त्रास होत असल्याने जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता टेस्ट पॉझिटिव्ह आली यानंतर ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर वायकोळे ग्रामसेवक रतन बोदडे माजी सरपंच सपना सरोदे उषा सरोदे बाबुराव सरोदे माजी ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरामध्ये सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करून घराच्या आजूबाजूला असलेल्या लोकांची टेस्ट करून घेतली आहे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणात अंतर्गत पन्नास घरांचे दररोज सर्वेक्षण सुरू असून या परिसरात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेला आहे तसेच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असून खबरदारीचे उपाय घेतले जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *