भुसावळ (प्रतिनिधी )-
शहर काँग्रेस कमिटीतर्फे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेवून शेतकर्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी केंद्र सरकारच्या निर्णयाचाच जोरदार घोषणाबाजी करून कांद्याच्या माळा गळ्यात घालून निषेध बुधवार रोजी निषेध करण्यात आला. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, जगभरात लाकडाऊन असतांना मोठ्या कष्टाने शेतकर्यांने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येवू लागल्याचे दिसत होते, चार पैसे हातात पडतील अशी शेतकर्यांला आशा होती पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यात बंदी जाहीर करून शेतकर्यांवर घोर अन्याय केला आहे. ४ जून २०२० रोजी ककेंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेतल आणि तीन महिन्यात घुमजाव करून निर्णय बदलून शेतकर्यांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळुन शेतकर्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष रविंद्र निकम, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष मुनव्वर खान, प्रदेश संयोजक भगवान मेढे, राजेंद्र श्रीनाथ, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, महेंद्र महाले, किशोर जाधव, सुकदेव सोनवणे, प्रदीप नेहते, जॉनी गवळी, नारायण भोई, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलीम गवळी, युवक विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, जिल्हा महिला सरचिटणीस राणी खरात, महिला जिल्हा उपाध्यक्ष हमीदा गवळी, भुसावळ शहर सरचिटणीस शैलेश अहिरे आदींची उपस्थिती होती.



