भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील खडका चौफुली येथे
१४ सप्टेंबर रोजी २१ वर्षिय
अल्तमश रशीद शेख या तरुणावर चार पाच जणांनी चाकू सारख्या तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केल्याने या युवकाचा मृत्यु झाला

होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात चार आरोपींना ताब्यात घेतले तर आज फरार पाचवा आरोपी आदर्श उर्फ आदु गायकवाड यास ताब्यात घेतले .
याखुन प्रकरणी आरोपी शेख समीर शेख यूसुफ वय १८,शेख शाहरुख शेख यूसुफ वय २७,दोन्ही राहणार रिंग रोड,भुसावळ, समीर शेख रहेमान शेख , वय १८,राहणार १५ बंगला , शेख अमीर शेख यूसुफ वय १८ राहणार १५ बंगला यांना ताब्यात घेतले होते.तर आज बुधवार रोजी यातील पाचवा फरार आरोपी आदर्श उर्फ आदु गायकवाड वय १९ याच्या गुन्हे शोध पथक पोलिसांनी मुसक्या आवळल्या .
गुन्ह्यात फरार असलेला पाचवा आरोपी आदर्श उर्फ आदु मनोहर गायकवाड वय १९, याची उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे ५ वाजता पंधरा बंगला भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन ८३६/२०२० भा द वि कलम -३०२, १४४,१४७,१४८,१४९ प्रमाणे दिनांक १४ सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे, मंगेश गोटला, पोना रवींद्र बिऱ्हाडे,किशोर महाजन,रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, पो का विकास सातदिवे,प्रशांत परदेशी,ईश्वर भालेराव, योगेश महाजन,कृष्णा देशमुख अशांनी केली आहे.


