एकता कपूर यांना कायदेशीर नोटीस ;


भुसावळ –
धनगर समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी बालाजी प्रॉडक्शनच्या निर्मात्या एकता कपूर यांना कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे .
निर्मात्या एकता कपूर
यांनी वेब सिरीज व्हर्जीन भास्कर- 2 द्वारे एका मुलींच्या होस्टेलमध्ये काही बेकायदेशीर दृश्यांचे चित्रण केले असून या होस्टेलमध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव असल्याने धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. एकता कपूर यांनी वृत्तपत्रातून धनगर समाजाची माफी मागावी तसेच सदरचे दृश्य वेब सिरीजमधून वगळावे, अशी मागणी अ‍ॅड.सत्यनारायण आर.पाल यांनी केली आहे. कपूर यांचे प्रोडक्शन लायसन्स रद्द करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आल्याचे अ‍ॅड .पाल यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *