मिलिंद पाटील यांना डबल पीएच डी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-

तालुक्यातील साकेगाव येथील मुळ रहिवाशी व येथील तुळशीधन नगरातील रहिवासी तथा मेट्रो रेल्वेचे जीओ टेक्नीकल कन्सल्टंट मिलिंद सतीश पाटील यांंना नुकतीच आयआयटी मुंबई व मोनाश युनिव्हर्सीटी मेलबॉर्न (ऑस्ट्रेलिया) यांची डबल पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी भुकंप प्रतिरोधक भुयारी मार्ग या विषयावर शोध निबंध सादर केला होता. त्याना आयआयटी पवईचे स्थापत्य विभाग प्रमुख दीपंकर चौधरी व मोनाश युनिव्हर्सीटीचे मार्गदर्शक कुलगुरु डॉ. मार्गारेट गार्डनर यांचे मार्गदर्शन लाभले. आयआयटीचे संचालक सुभाषित चौधरी यांच्या हस्ते त्यांना ही डबल पीएचडी प्रदान करण्यात आली. नोबेल पुरस्कार प्राप्त प्रा. डंकन हल्डन, स्टीफन श्‍वार्जमैन, ब्लॅकस्टोन यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी प्रवरानगर (लोणी)येथे बी.ई तर गुवाहाटी येथे एम टेक (आयआयटी) केले आहे. ते मध्य रेल्वेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यालय अधिक्षक (कार्मिक) सतीश पाटील यांचे सुपुत्र आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *