भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी केळी व्यापारी सोबत आज शनिवार दिनांक १२ रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन विडिओ कॉन्फेरंस द्वारे चर्चा केली . भविष्यात केळीची लोडिंग वाढविण्या संदर्भात चर्चा सर्व रावेर , निंभोरा , सावदा येथील व्यापारीन सोबत चर्चा करण्यात आली .
तत्पूर्वी मंडळ वाणिज्य प्रबंधक बी अरुण कुमार यांनी सर्व व्यापाऱ्यांचे स्वागत केले आणि परिचय करुन दिला .आणि मीटिंगला सुरुवात करण्यात आली . यावेळी व्यापाऱ्यांच्या समस्या , जाणुन घेण्यात आल्या . आणि मंडळ रेल्वे प्रबंधक यांनी आश्वासन दिले कि सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल व सर्वतोपरी सहकार्य हे रेल्वे कडून करण्यात येईल. व्यापारी संघाकडून रेल्वेला पण आश्वासन दिले कि ते पुढील भविष्यात केळीची लोडींग हि सुरु करण्याबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल .
सदर मिटिंग मध्ये वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर के शर्मा यांनी केळी हि बीसीएन वॅगन किंवा पार्सल यान ( विपी ) द्वारे सुद्धा पाठवू शकतील हे सांगण्यात आले .
केळी व्यापारी संघाकडून डी के महाजन , हरीश गनवाणी , नरेश सेठ , रामदास त्रंबक , कडु धोंडू , पिंटू सेठ, भागवत पाटील हे उपस्थित होते .
वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज आर पाटील यांनी सर्व व्यापारी चे धन्यवाद केले आणि मिटिंगची सांगता झाली .



