गरजवंत बेरोजगार तरुणांचे आर्थिक शोषण करणाऱ्याची चौकशी करा – युवा स्वाभिमान पार्टीची मागणी ;

गरजवंत बेरोजगार तरुणांचे आर्थिक शोषण करणाऱ्याची चौकशी करा – युवा स्वाभिमान पार्टीची मागणी ;
भुसावळ (प्रतिनिधी )-
जिनियस इन्फोटेक कंपनी कलकत्ता यांचे काम किरण कुलकर्णी यांनी पेटी कॉन्ट्रॅक्टर म्हणून घेतले आहे. ते कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करीत असून त्यांची चौकशी करण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीचे भुसावळ तालुका अध्यक्ष दर्शन ठाकूर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कलकत्ता येथील जिनियस इन्फोटेक कंपनीने पेटी कॉन्ट्रॅक्ट किरण कुलकर्णी यांना दिला आहे. किरण कुलकर्णी गरजवंत बेरोजगार मुलांना कामांवर ठेवत आहे. या गरजवंत मुलांना ठरलेले वेतन न देता कमी वेतन देत आहे. या गरजवंत मुलांचे बँक पास बुक व एटीएम कार्ड त्याच्याकडे जमा न केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असतो. याबाबत एच आर जिनियस इन्फोटेक, जिल्हाधिकारी, लेबर कमिशन, भुसावळ तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असून निवेदनाद्वारे किरण कुलकर्णीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *