भुसावळ(प्रतिनिधी )-
येथील रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांच्या सुविधासाठी बनवण्यात आलेले प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर नवीन वातानुकूलित प्रतिक्षालयाचे आज शुक्रवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी ११ वाजता विडिओ लिंक द्वारे उदघाटन करण्यात आले . याप्रसंगी कार्यक्रमात प्रमुख खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी फोन वर शुभेच्छा दिल्या ,त्याच बरोबर आमदार संजय सावकारे, प्रवासी सुविधा समिती सदस्य डॉ. राजेंद्र फडके, मंडळ रेल उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य परीक्षित बऱ्हाटे, डॉ माधव धांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर के शर्मा यांनी केली आणि मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी सर्व प्रमुख अतिथी यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची प्रस्तावना वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी केली . नवीन वातानुकूलित प्रतिक्षालयाचे उदघाटन हे विडिओ लिंक द्वारे करण्यात आले . याप्रसंगी अप्पर मंडळ रेल प्रबंधक मनोज सिन्हा , वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर के शर्मा, मंडळ अभियंता श्री तोमर हे उपस्थित होते. तसेच भुसावळ स्थानकावर स्टेशन डायरेक्टर जी.आर.अय्यर, स्टेशन प्रबंधक श्रीवास्तव , मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
आमदार संजय सावकारे व य
प्रवासी सुविधा समिती चे सदस्य डॉ राजेंद्र फडके यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले.
मंडळ वाणिज्य प्रबंधक बी अरुण कुमार यांनी सर्व सदस्याचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली .



