भुसावळ नगरपरिषदेचे कामकाज दोन दिवस बंद ;


भुसावळ (प्रतिनिधि )-
भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे यांना कोरोनाची लागन झाल्याचे आढळून आल्याने भुसावळ नगरपरिषदेत खळबळ उडालेली आहे. त्यांचा नगरसेवकांशी व नागरिकांशी सतत जनसंपर्क येत असतो.तसेच नगराध्यक्ष भोळे यांचा नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असलेला व्यापक जनसंपर्क लक्षात घेता काही लक्षणे आढळलेल्या भोळे यांच्या संपर्कातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना चाचण्या करण्यात येणार आहे.सदरील चाचण्या ह्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे भुसावळ नगरपरिषदेच्या कार्यालयात विविध कामानिमित्त येणारे नागरीक व पदाधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दिनांक 7 व 8 सप्टेंबर 2020 दोन दिवस नगरपरिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.अशी सूचना नोटीस पालिके बाहेरील फलकावर मुख्याधिकारी
यांनी लावलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *