भुसावळ (प्रतिनिधी )
भुसावळ नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे हे कोरोना पॉझिटीव्ह झाले असून त्यांनी याबाबत स्वत: माहिती दिली आहे.
रविवारी केलेल्या चाचणीत ते कोरोना बाधीत असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत स्वत: माहिती देऊन आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी न घाबरता कोरोनाचा प्रतिकार करावा असे देखील त्यांनी नमूद केले आहे.



