भुसावळ (प्रतिनिधी )-
सर्व धार्मिक स्थळे उघडण्या बाबत तसेच आरक्षण मिळणे बाबत मुस्लिम समाजमंचच्या वतीने व संविधान बचावच्या पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून देशातील सर्व धार्मिक स्थळे शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आली आहेत .ही सर्व धार्मिक स्थळे उघण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भुसावळ येथील मुस्लिम समाज मंचच्या वतीने करण्यात आली असून मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी संविधान बचाव समिती तर्फे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील मंदिर , मस्जिद , विहार , गुरूद्वार ,चर्च आदी धार्मिक स्थळे बंद केली आहेत . हि धार्मिक स्थळे उघडून प्रार्थना करण्यासाठी परवानगी द्यावी .तसेच जनमाणसात अध्यात्मिक वातावरण निर्माण करावे . अशी मागणी मुस्लिम समाजमंचचे अध्यक्ष माजी नगरसेवक साबिर शेख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे .
तर संविधान बचाव समितीचे अध्यक्ष मुन्नन्वर खान यांनी मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी तहसीलदार दिपक धिवरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी पदाधिकारी उपस्थित होते .



