‘
भुसावळ (प्रतिनिधी )-
शेतकरी लोकांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या सोयीसाठी दिनांक ८ सप्टेंबरपासून दर मंगळवार , गुरुवार आणि शनिवार ला “किसान रेल” पार्सल गाड़ी चालवली जात आहे . त्यामुळे शेतकरी , व्यापारी , बाजार समिती , लोडर्स यांना आपल्या सोयीनुसार जास्तीत जास्त प्रमाणात माल पाठविता येईल .
गाड़ी क्रमांक ००१०७ डाउन देवळाली ते मुजफ्फरपुर किसान पार्सल गाड़ी ही प्रत्येक मंगळवार , गुरुवार आणि शनिवार ला देवळाली स्टेशनहुन वाजता प्रस्थान करुन गुरुवार ,शनिवार आणि सोमवार ला सकाळी ०४.४५ वाजता मुजफ्फरपुर स्टेशनला पोहचेल .
दरम्यान गाडी नाशिक रोड ६.१०./६.३० मनमाड-७.३० /७.५५ जळगाव-९.५५/१०.१५ भुसावळ-१०.४५/१.१५ बुधवार,शुक्रवार आणि मंगळवार रोजी बरहानपुर १२.५/१२.२०, खंडवा -२.१०/२.२५ , इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंगपुर,जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि दानापुर याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.
गाडी क्रमांक ००१०८ अप मुजफ्फरपुर ते देवळाली ही गाडी प्रत्येक गुरुवार , शनिवार आणि सोमवार रोजी ८ वाजता प्रस्थान करून शुक्रवार , रविवार आणि मंगळवारी ५.४५ वाजता देवळालीला पोहोचल.
थांबा – शुक्रवार , रविवार आणि मंगळवारी
खंडवा – ९.५५/१०.१५ , बुऱ्हाणपूर – ११.३५/११.५५ , भुसावळ – १२.५०/१.१० , जळगांव – १.४०/१.५०, मनमाड ३.५०/१६.१० , नासिक – १७.१५/१७.३५
तरी शेतकरी बांधवानी त्यांचा माल बुक करण्यासाठी माल पॅक करून आपल्या जवळ पासच्या पार्सल ऑफिस मध्ये आणावा . सोबत आधार कार्ड ची झेरॉक्स ठेवावी लागेल . शेतकरी ,कार्गो एग्री ग्रेटर , व्यापारी ,बाजार समिती , आणि लोडर्स , याना आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा लागेल . शेतकऱ्यांनी या गाडीचा जास्तीत जास्त उपयोग घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे .



