गुरू रविदास क्लबच्या वतीने जिल्ह्यातील गुणवंतांचा ६ सप्टेंबरला होणार सत्कार ; ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन ;


भुसावळ ( प्रतिनिधी) –
जळगाव जिल्हा गुरु रविदास क्लबच्यावतीने प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो परंतु यावर्षी करुणा विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे एकत्रित कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने ऑनलाइन झूम ॲप व फेसबुक च्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन ६ सप्टेंबर ला दुपारी १ वाजता करण्यात आलेले आहे
गुरू रविदास क्लब जळगाव यांच्यावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शनासाठी गुणगौरव समारंभाचे आयोजन केले जाते परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता एकत्रित येऊन कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरत झूम ॲपच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी आरटीओ विभागाचे किरण मोरे व्यवसाय मार्गदर्शक निलेश गोरे क्लब चे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी सचिव पी आर आंबेडकर उपस्थित राहणार आहे
या कार्यक्रमासाठी गुगल फॉर्म च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक ऑनलाइन त्यांच्या बँकेत जमा करण्यात येणार आहे प्रमाणपत्र व ग्रंथ भेट नंतर घरोघरी पोचविण्यात येणार आहे या उपक्रमासाठी यशवंत ठोसरे संजू भटकर संजय वानखेडे प्रा. गणेश सूर्यवंशी प्रकाश रोझतकर प्रा. विठ्ठल सावकारे कैलास वाघ गणेश सुरळकर निवृत्ती सूर्यवंशी सुनील वानखेडे आदी मंडळी परिश्रम घेत आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले असून झुम मीटिंग आयडी 846445055093 व पासवर्ड SHREE आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *