भुसावळ (प्रतिनिधि )-
तापी नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीत कोरोना आजाराने मृत असलेल्यांचा मृतदेहावर अंत्यविधी करण्याकरीता पर्यायी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी येथील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी यांचेशी
२६ ऑगष्ट रोजी तसेच भुसावळ मुख्याधिकारी चंद्रवार यांना निवेदन देण्यात आले आहे . .
भुसावळ शहरासाठी तापी नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीत कोरोना आजाराने मृत असलेल्यांचा अंत्यविधी केला जात आहे. शहराची लोकसंख्या पाहता स्मशानभूमीची जागा पूर्ववत असल्याने आज इतर (कोरोना सोडून) मृतदेहांची दररोजची संख्या या पाहता तुल्यबळ आहे .परंतु आजच्या परिस्थितीत मृत्यू संख्या वाढत असल्याने भुसावळसह परिसरातील सर्वच तालुक्यातील कोरोना मृतदेह या ठिकाणी आणले जातात परंतु नैसर्गिक मृतदेह अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना यापासून संसर्गाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामुळे स्मशानभूमीत नैसर्गिक मृत्यू झालेल्या मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भुसावळ स्मशानभूमी ही तापी नदी पुलाच्या पूर्वेस असून पुलाच्या पश्चिमेस सुद्धा मोकळी जागा उपलब्ध आहे ,त्या परिसरात जर आपण कोरोना मृतदेह अंत्यविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली तर त्यात नागरिकांची सुरक्षितता व मनातील निर्माण झालेली भीती यातून सुटकेचा निश्वास घेता येईल. तापी नदी पुलाच्या पश्चिमेस अनेक वर्षापासून सातारे गाव परिसरातील मृतदेह अंत्यविधीसाठी आणले जातात त्यामुळे तिकडे येणे जाणे व वावरणे हे सहज शक्य आहे, त्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध आहे,
तरी आपण याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा व जनतेमधील भीती होणारा धोका तसेच कोरोना संसर्ग होण्याच्या वेळेपूर्वीच दखल घेऊन निर्णय घेत कोरोना मृतदेह अंत्यविधी साठी स्वतंत्र जागेची सुविधा करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी नगराध्यक्ष उमेश कालिदास नेमाडे यांनी केली असून मुख्याधिकारी चंद्रवार यांना निवेदना देण्यात आले आहे .



