जळगाव –
जळगांव जिल्ह्यामध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजीच्या आदेशान्वये सर्व प्रकारचे राजकीय ,सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक ,धार्मिक कार्यक्रम व इतर मोठया प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रम यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच शासन परिपत्रक दिनांक १७ जुलै, २०२० नुसार सर्व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत.तथापि नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाइंन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक १८ऑगस्ट रोजी “पोळा” या सणाच्या निमित्ताने जळगांव जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे . नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी बैल पूजा घरीच करावी. बैलांची मिरवणूक काढण्यात येवू नये. सार्वजनिक प्रसादाचे वाटप करण्यात येवू नये. तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून
असे आदेश जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.



