भुसावळ (प्रतिनिधी )-
रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून पर्यावरण बचाव करण्यासाठी रोटरी क्लब सदस्याच्या वाढदिवसानिमित्त त्या सदस्याच्या घराच्या परिसरात त्याच्या हातून वृक्षरोपण करण्याचा आगळावेगळा उपक्रम रोटरीचे अध्यक्ष गजानन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला.
मंगळवार रोजी रोटरीचे सदस्य रोटेरियन सारंग चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्राची बंगल्याचे परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळचे प्रेसिडेंट गजानन ठाकूर, रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट राजेश अग्रवाल, महेश भराडे, हेमंत नाईक, रोटेरियन सतीश अग्रवाल प्रेसिडेंट इलेक्ट राजेंद्रकुमार फेगडे, रोटेरियन आरती चौधरी , मनोज गुलाईकर इत्यादी उपस्थित होते



