भुसावळ (प्रतिनिधी )-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)गटातर्फे भुसावह शहर व तालुक्यातील नियमीत विज ग्राहक नागरीक व व्यावसायिक सध्या कोरोना महामारीचे थैमान व संकटाचा सामना करीत असुन लाॅकडाऊनमुळे सर्व काम धंदे, रोजगार बंद आहे.घरातच बसून शासनाच्या लॉकडाऊनचे कडेकोड पालन करुन घरातच बसून असलेल्या गोरगरीब, कष्टकरी शेतमजूर जनतेला पोट भरणे कठीण होऊन उपासमारीची वेळ आली आहे.महामारीच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीचे
लोकांनी घरोघरी विज बील रिडींग मिटरचे अंधाधुंद मनमानी पध्दतीने जास्तीची बिले आकारली आहे.कोरोनामुळे भयभित जनतेचे विज मंडळाच्या लोकांनी अती जास्तीचे रिडींग बिलाची आकारणी करुन लोकांची कंबर मोडलेली दिसून येत आहे.तरी विज बील माफी करण्यात यावी व शासनाने केलेली वीज दरवाढ रद्द करण्यात यावी अशा मागण्या रिपाइं आठवले गटातर्फे करण्यात आल्या आहे. सोशल डिस्टन्सींगचे व शासन नियमाचे पालन करुन त्रस्त नागरीकांच्या तक्रारी
वरुन जनतेच्या हिताच्या मागण्या निर्दशनास आणून देण्यासाठी निवेदन देण्यात येऊन शासनाकडे
पाठ पुरावा करून खुलासा करावा व न्याय मिळावा अन्यथा लोकशाही मार्गाने येत्या १५ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे,जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी,युवा जिल्हाध्यक्ष रवि सपकाळे,युवा जिल्हा कार्याध्यक्ष गिरीश तायडे,खान्देश प्रभारी लक्ष्मण जाधव,पप्पु सुरडकर, विश्वास खरात,भिमराव वाघ, भगवान निरभवणे,बाळु सोनवणे, प्रकाश सोनवणे,गोरख सुरवाडे –
पप्पु सुरडकर,बाळु सोनवणे,विश्वास खरात,भिमराव वाघ,भगवान निरभवणे आदी उपस्थित होते.



