रावेर (प्रतिनिधी )-
येथील रेल्वे स्थानक रस्त्यावरील रावेर न्यायालयाच्या आवारात दावते इस्लामी हिंद तर्फे न्यायाधीश श्री आर.एल.राठोड व माननीय न्यायाधीश श्री लोडगे यांच्या हस्ते दि.१२ जुलै रविवार रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी दावत ए इस्लामीचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम यांनी सांगितले की,आम्हीआमच्या संस्थेमार्फत संपूर्ण भारतात दि.२० एप्रिल पासून वृक्षारोपण मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत आमचे संपूर्ण भारतात १ कोटी २० लक्ष वृक्ष लावण्याचा आमचा संकल्प आहे. तरी सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या परिसरात वृक्षारोपण करावे व आपल्या देशात सर्वत्र हिरवेगार करा असे आवाहन केले.
या कार्यक्रमात सरकारी वकील वारुळे अब्दुल समद,इस्माईल शेख,रईस शेख व कामिल शेख उपस्थित होते.



