वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी वाचवले घोरपडीचे प्राण ; धाडस दाखवत थांबवली नरजातीच्या घोरपडीची शिकार


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुका परिसरातील वरणगाव रस्त्यावर पावसाळ्यात घोरपडी विक्रीस येत असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांना मिळाली होती, त्या अनुषंगाने संस्थेचे कार्यकर्ते या भागात लक्ष ठेवून होते शुक्रवारी रात्री ८ च्या दरम्यान दीपक नाटेकर हे स्नेक रेस्कु साठी गेले यावेळी तपास म्हणून त्या परिसरात ते गेले तेव्हा काही लोक रस्त्याच्या कडेला पिशवी घेऊन बसल्याचे दिसले त्यांच्याशी चर्चा करत असतांना दीपक नाटेकर यांना शनिवार ४ जुलै रोजी घोरपड विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली, तीन व्यक्तींजवळ एका पिशवीत घोरपड असल्याची खात्री झाल्यावर घरी दाखवण्यासाठी घोरपडीचा फोटो पाठवतो असे सांगून दीपक यांनी मोबाईलद्वारे संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांना सदर माहिती दिली. त्यानुसार घोरपडीची 2500 रुपये किंमत ठरली , दरम्यान देवरे यांनी संस्थेच्या कंट्रोल रूम या व्हाट्सअप ग्रुप वर वरील माहिती टाकत दीपक एकटे असल्याने त्यांना मदतीसाठी सहकाऱ्यांनी जावे असे कळवले. दीपक ने वनक्षेत्रपाल श्री बच्छाव यांना घटना कळवण्यासाठी कॉल केला असता संपर्क होऊ शकला नाही परंतु कोणतीही कारवाई वनविभागाच्या महितीतच करावी हा संस्थेचा नियम असल्याने त्यांनी 1926 या वनविभागाच्या तक्रार हेल्पलाईन वर संपर्क साधून माहिती दिली .विक्रेत्याशी बोलणे सुरू ठेवले त्या दरम्यान वनविभागाचे वनरक्षक गवळी यांनी दीपक ₹ला संपर्क केला त्या नंतर मुंबई वनविभागा मार्फत देखील माहिती घेण्यात आली तो पर्यंत घोरपड विक्रेत्यांना संशय आला.
वेळ कमी असल्याने आणि विक्रेते पसार होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात येताच दीपक ने त्यांच्यावर झडप घातली घोरपडीची पिशवी ताब्यात घेतली.यावेळी दोघां शिकारी यांनी ती हिसकवण्यासाठी झटापट करत असतांनाच संस्थेचे रवी तायडे घटनास्थळी पोचले. शिकाऱ्याजवळ हत्यार असू शकते हा अंदाज आल्याने त्यांना घाबरविण्यासाठी येथे अजून कार्यकर्ते आणि वनविभागवाले येताय असे सांगत तायडे पुढे सरकले ते पाहून शिकाऱ्यांनी धूम ठोकली. प्रसंगी झटापट झाली पण घोरपड मात्र पळवता आली नाही याचे समाधान मानत दिपक नाटेकर यांनी परत 1926 या क्रमांकावर संपर्क साधून नर जातीची घोरपड ताब्यात घेतल्याची माहिती दिली .
शिकारी घोरपड पकडतांना तिला शेपटीवर किंवा डोक्यावर दणका मारून जखमी करत असतात जेणेकरून तिची हालचाल मंदावते आम्ही ताब्यात घेतलेली घोरपड पूर्ण वाढ झालेली असून ती वरील प्रकारे जखमी केलेली होती सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी श्री तायडे यांनी वैद्यकीय तपासणी केली असता तीचे नखे काढण्यात आल्याचे देखील दिसून आले उपचार करून सुस्थितीत आल्यावर सदर घोरपड वनविभागाच्या निर्देशाने सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले असे दिकप नाटेकर यांनी सांगितले.
शिकार रोखण्यासाठी वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, दीपक नाटेकर, रवी तायडे, अॅलेक्स प्रेसडी, गौरव शिंदे, विजय रायपूरे, सतीश कांबळे, स्कायलेब डिसुझा, जयेश चौधरी, राहुल आराक, धीरज शेकोकारे , यांचे सहकार्य लाभले तसेच वनपाल एल डी गवळी , वनरक्षक एम जी बोरसे यांचे मार्गदर्शन ही लाभले.
वन्य प्राण्यांच्या मांसात विषाणूजन्य आजार –
घोरपडी च्या बाबतीत अनेक अंधश्रद्धा असून तिचे मांस खाण्याने किंवा कोणताही अवयव वापरून कोणताच फायदा होत नाही उलट अश्या वन्य प्राण्यांच्या मांसात असलेले परजीवी आपल्या शरीरात दाखल होऊन वेगवेगळे विषाणूजन्य आजार पसरवतात याच प्रकारच्या काही विषाणूंचा जीवघेणा प्रकोप सध्या संपूर्ण जग भोगत आहे नागरिकांनी या कडे गांभीर्याने लक्ष देत आपल्या अन्नात वन्यजीवांचा वापर टाळला पाहिजे माहीती वन्यजीव संरक्षण संस्थाचे बाळकृष्ण देवरे यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *