भुसावळात जुगाराच्या अड्डयावर धाड : पाच जुगारी अटकेत ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील सिंधी कॉलनीतील बडा सेवा मंडळाच्या बाजूला स्ट्रीट लाईटाखाली जुगार सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी तवारीर याठिकाणी धाड टाकली या कारवाईत साडेचार हजार रुपयांच्या रोकडसह पाच जुगार्‍यांच्या मुसक्या आवळल्या. २ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली यात आरोपीं रीतेश जानकीदास रत्नानी २८ सिंधी कॉलनी, भुसावळ , दिनेश कन्हैय्याला बत्रा ४१, सिंधी कॉलनी , सुरेंद्र अनिलकुमार बत्रा २८ नानक नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ , आकाश अशोककुमार कुकरेजा वय २९, सिंधी कॉलनी, भुसावळ, महेश लक्ष्मण वकारे वय ३६, सोमानी गार्डन, प्रभाकर हॉलमागे, भुसावळ ,यां आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणी प्रशांत रमेश परदेशी यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *