भाविकांनी घेतले बंद दारातून लाडक्या विठुचे दर्शन ;


भुसावळ-(प्रतिनिधी ) –
पांडुरंग पांडुरंग
नाम असावे मुखात…।
पंचप्राण होती गोळा
तुझ्या किर्तने कारण…।।
धरतोस आम्हावरी

तुझ्या कृपेची सावली…।
आम्हा लेकरांची देवा
तू तर विठू माऊली…।।

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा फैलाव रोखण्याकरीता गर्दी होवू नये म्हणून गेल्या तीन महिन्यांपासुन देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यात विविध धार्मिक मंदिरे व प्रार्थनास्थळे बंदच आहेत. अशा परिस्थितीत आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे भक्त व भाविक वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुखमाईचे दर्शन शहरातील भाविकांनी बंद दरवाजातूनच घेतले.
शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील पुरातन विठ्ठल मंदिर, जुना सातारा भागातील विठ्ठल मंदिर, शांतीनगरातील विठ्ठल मंदिर, पंढरीनाथ नगरातील विठ्ठल मंदिराबाहेरून भाविकांनी दर्शन घेतले.
सकाळी मंदिराचे पुजारी जनार्दन जोशी यांनी विठ्ठल रुखमाई यांना महाअभिषेक करून महाआरती केली. मंदिर परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला . मंदिराजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त होता .
सुनसगाव, ता.यावल –
येथील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सकाळी पंचायत समिती सभापती मनिषा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, संचालक दिलीप पाटील व छाया पाटील यांच्या हस्ते संजय शास्त्री महाराज (नशिराबाद) यांनी वेद मंत्रांच्या घोषात श्री विठ्ठल व रुख्मिणी यांची महापूजा केली. तसेच दिवसभर रामकृष्ण हरी मंत्राचा नामजप करण्यात आला. कोरोनामुळे मंदीरात येणारे भाविक भक्तांनी सोशल डिस्टनिंग ठेवून श्री.पांडुरंगाचे दर्शन घेतले तसेच मास्क लावूनच भाविक भक्तांनी भजने सादर केले. रात्री गावातील वैष्णवी महिला भजनी मंडळी ने अभंग व गवळणी सादर केल्या गेल्या तीन महिन्यांपासून मंदीरातील सनाई चौघड्यांचा आवाज बंद होता. आषाढी निमित्त भाविक भक्तांच्या कानावर आवाज पडला. आता पासून चार महिने काकडा आरती व भजन सुरू होणार असून सालाबादप्रफाणे यंदाही चातुर्मास पाळणार असल्याचे समजते. आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन येथील विठ्ठल मंदिर संस्थानने केले होते. सर्व भाविकांनी परिश्रम घेतले.
फेकरी, ता.भुसावळ –
येथील वीज निर्मिती केंद्राच्या गेट नं. १ समोर आषाढी एकादशीनिमित्त ऑर्डनन्स फॅक्टरी कार्यसमिती सदस्य राजकिरण निकम व मित्र मंडळाच्या वतीने ङ्गराळ वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी सुरक्षा अधिकारी जे.पी. कदम यांच्या उपस्थितीत विठू माऊलींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रसंगी ङ्गेकरी सरपंच निर्मला निकम, निंभोरा सरपंच शोभाबाई मोरे, के.एम. निकम, शेतकी संघाचे संचालक प्रशांत निकम, संदीप निकम, ग्रा.पं. सदस्य संजय भिरूड, गणेश नाफ़डे, श्री.मुंडके, निश्‍चल झोपे, कौतिक वाघोदे, राजेश निकम, माजी सरपंच प्रकाश झोपे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अरविंद सुरवाडे, मनोज मोरे, वैभव मेढे, भावेश मेढे, प्रशांत सोनवणे, सागर निकम, मुकेश सपकाळे, निखिल तायडे, लता निकम यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *