नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची मनमानी; ब्लॅकमेलिंग करून करताय वसूली : आमदार संजय सावकारे ;


भुसावळ ( प्रतिनिधी )-
शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग , मास्क व सनीटायझर आदी नियमांचे उल्लंघन केल्याचे नावाखाली नगरपरिषदेचे काही कर्मचारी दुकानदारांना ब्लॅकमेलिंग करून वसुली करीत असल्याचे तक्रारी आमदार संजय सावकारे यांच्याकडे आल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विनाकारण दुकानदारांची ही पिळवणुक जर थांबविली नाही तर योग्य कारवाई केली जाणार असा इशारा शनिवार २७ रोजी प्रांत कार्यालयात झालेल्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये आमदारांनी दिला.
उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात १२ वाजेला सर्व पक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये कोरोना बाधित रुग्ण कटेन्मेंट झोनच्या बाहेर फिरत आहे. सध्या मलेरिया,सर्दी, खोकला यासारखे आजार उद्भवत आहे.खाजगी डॉक्टर उपचार करण्यास टाळाटाळ करीत आहे असे अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्याने त्यावर चर्चा करून मार्ग काढण्यात आले.रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.कनेन्मेंट झोनमध्ये असलेल्या बँकेमध्ये पेंशन घेणाऱ्या पेंशनरांचे अतोनात हाल होत आहे. यावर मार्ग काढण्यात यावा तसेच आशा वर्कर यांचेकडून शहरातील नागरिकांना कोरोना बद्दल माहिती पुरविण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण आढळून आला त्या रुग्णांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा ज्या रुग्णाने कॉरनटाइन होणे टाळले वा न ऐकल्यास गुन्हे दाखल करण्यात यावे यासह शहरामध्ये पोलीस अधिकारी व एस.आर.पी.एफ.चे कर्मचारी फिरतांना दिसत नसल्याच्या आरोपी आमदारांनी बैठकीत करीत शहरात जनता कोणालाच घाबरत नाही फक्त खाकीला घाबरते यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त वाढवावा विना मास्क फिरणारे ,रस्त्यावर थूंकनारे , विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करा अशी सूचना वजा मागणी यावेळी केली .
शहरातील संशयित रुग्णांचे दिवसभरातून किमान ५०० स्वब घेतले जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी यावेळी दिली. बैठकीमध्ये नगरसेवकांना येणाऱ्या अडीअडचणी तसेच तक्रारी जाणुन घेवून तक्रारिंचे निराकरण केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *