घरफोडी व चोरीप्रकरणातील ६९हजाराचा माल आरोपींकडून हस्तगत ;


भुसावळ ( प्रतिनिधी )-
येथील आठवडे बाजार मधील अप्सरा दुकानाच्या पाठीमागिल भागातील दोन दुकानां मध्ये घरफोडी व चोरी करणाऱ्यां तीघा आरोपीना अटक करून त्यांचेकडून ६९ हजाराचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे .
येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन ६०१/२०२० व गुरन ६०२/२०२० भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच दिनांक १९ जून रोजी सायंकाळी ७ ते दिनांक २० जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात आठवडे बाजार मधील अप्सरा दुकाना मागे असलेले गोडावूनचा पत्रा वाकवून दुकानातून कोणी तरी अज्ञात चोरांनी ५९,००० /-रु कीमतीचे बँटेक्सचे दागिने चोरून नेले होते.याबाबत फिर्यादी दिलीप घनश्याम उदासी वय ३७ ,रा.हनुमान नगर भुसावळ यांनी फिर्याद दिली होती .
तर त्याचवेळी दुसरे फिर्यादी बिलाल शहा मुझ्झफर शहा वय ३० राहणार गौसिया नगर भुसावळ यांचे ही भुसावळ शहरातील आठवडे बाजार भागात अप्सरा दुकानच्या मागे कोणीतरी अज्ञात चोरांनी त्याच्या गोडाऊन मधून १० हजार रुपये कीमतीचे साडीचे लेस व लटकन असलेला माल चोरून नेल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल झाले आहे.
सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमी वरुन संशयित आरोपी सोनू मोहन अवसरमल वय २२ रा.वाल्मिक नगर भुसावळ , आकाश बाबुराव इंगळे वय २८ रा.राहुल नगर भुसावळ , चेतन पुंजाजी कांडेलकर वय २९ रा.पंचशील नगर भुसावळ याना भुसावळ शहरातून राहून नगर भागातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले . अटक आरोपी यांनी गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान आरोपी यांनी पोलीस कोठडी दरम्यान दोन्ही गुन्ह्यातील गेला माल एकूण ६९०००/-रु चा भुसावळ शहरातून राहूल नगर मधील आरोपी आकाश इंगळे याच्या घरातून काढुन दिला . सदर गुन्ह्यात १०० टक्के गेला माल हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले ,अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे,पोना. किशोर महाजन, रमण सुरळकर,समाधान पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी,ईश्वर भालेराव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *