पडळकरांनी माफी मागितली नाही, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ: तालुका प्रमुख समाधान महाजन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचा भाजपने राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. दोन दिवसात पडळकरांनी माफी मागितली नाही, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी दिला आहे. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांनी यायचे की नाही ते पंढरीचा विठ्ठल व भक्त ठरवतील. त्यामुळे पडळकरांनी आता विठ्ठलाच्या नावावर कोणाला सल्ले देऊ नयेत, असे शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन म्हणाले. भाजप आमदाराच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आयोजित तालुका बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या विरोधात बोलून प्रकाश झोतात येण्याचा पडळकरांचा प्रयत्न….. प्रा.धिरज पाटील ;
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपुरात न येण्याचा सल्ला देऊन मुंबईतील कोरोनाबाधितांच्या प्रमाणाचा उल्लेख पडळकरांनी करून त्यांचाही अवमान केला आहे. मुख्यमंत्र्यां बरोबरच शरद पवारांना कोरोना संबोधून पडळकरांनी महाराष्ट्रच्या राजकीय परंपरेला काळीमा फासला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या विरोधात बोलून प्रकाश झोतात येण्याचा पडळकरांचा प्रयत्न आहे असे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील म्हणाले.
पडळकरांच्या वक्तव्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगीरी व्यक्त केली. भाजपचे अन्य नेतेसुद्धा या वक्तव्याशी सहमत नाहीत. त्यामुळे भाजपने केवळ दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी पडळकरांची आमदारकी काढून घेऊन त्यांची हकालपट्टी करावी. अशी कारवाई न झाल्यास भाजपसुद्धा या कटकारस्थानाचा भाग असल्याची महाराष्ट्राला खात्री पटेल. पडळकरांवर कारवाई झाल्यास खरोखर भाजप शिस्तप्रिय पक्ष आहे, हे आम्ही जाहीरपणे कबूल करू असे मत विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *