भुसावळ (प्रतिनिधी) –
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी 5तालुका पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीस अटक केली आहे दरम्यान आरोपी यास न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठड़ीचे आदेश दिले आहे .
तालुका पोलीस स्टेशन हद्दीत 22 जून रोजी साकेगांव येथे बाळु वासुदेव आमोदेकर रा. साकेगांव यांचे राहते घराचा कडी कोंडा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोंडुन घरात प्रवेश करून घरातील 4 पंखे, गँस हंडी,शेगडी मिक्सर असा एकुण 52 हजार 600 ऱूपये किंमतीचा माल घरफोडी करून नेल्या बाबत तालुका पोलिस स्टेशनला गुरन 189/2020 454,457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . या गुन्ह्याचे तपासात अज्ञात चोरट्याची गुप्त बातमीदारामार्फत माहीती काढुन संशयित आरोपी गुरूलाल भगवानसिंग बिलाला वय 48 रा. बोगदरा ता.जि. खरगौण मध्यप्रदेश याची सखोल चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिल्याने त्यास घरफोडी प्रकरणी अटक करण्यात आली .
दरम्यान आरोपीस न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी आदेश न्यायालयाने दिला . तपासात भारतीय पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे आरोपीं कडुन गुह्यातील माल 4 पंखे, पाण्याची मोटार, गँस हंडी , शेगडी, मिक्सर एकुण 52वहजार 600 रूपये किंमतीचा माल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनी अमोल पवार, पोहेकाँ विठ्ठल फुसे, पोहेकाँ अजय माळी,पोहेकाँ युनूस शेख, पोना विजय पोहेकर यांनी केलेली आहे.



