अपंगांना त्यांच्या जवळच्या आरक्षण कार्यालयातून ओळखपत्र मिळणार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
नाशिक, मनमाड, जळगाव, धुळे, मलकापूर, अकोला, अमरावती, खंडवा, बुरहानपूर येथील आरक्षण कार्यालयात अपंग व्यक्तींना सवलत ओळखपत्र दिले जाईल.
सध्या अपंगांना त्यांच्या जवळच्या आरक्षण कार्यालयात ओळखपत्र बनविण्यासाठी अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे, परंतु ओळखपत्र मिळविण्यासाठी त्यांना विभागीय कार्यालयात यावे लागत होते .
सध्याच्या परिस्थितीचा विचार करता ओळखपत्र देण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने जवळच्या आरक्षण कार्यालयात केली गेली आहे. त्यांना नाशिक, मनमाड, जळगाव, धुळे, मलकापूर, अकोला, अमरावती, खंडवा, बुरहानपूर या स्थानकांच्या आरक्षण कार्यालयातुन कार्ड दिले जातील.
मंडल कार्यालयाद्वारा फोनवर कळविल्यानंतर सबंधित अपंग व्यक्ती त्यांच्या मूळ कागदपत्रांसह त्या स्टेशनच्या आरक्षण कार्यालयात जाऊन त्यांचे कार्ड घेऊ शकतात.असेही रेल्वे प्रशासनाने कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *