ख्‍वाजा मोईनोद्‍दीन चिश्‍तींबद्‍दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य,कडक कारवाईची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
अजमेर येथील मुस्‍लीम समाजाचे सुफी संत हजरत ख्‍वाजा मोईनोद्‍दीन चिश्‍ती यांच्‍याबद्‍दल दि.16 जुन रोजी न्‍युज 18 इंडिया या चॅनलवर डिबेट सुरू असतांना या चॅनलचे अँकर अमीश देवगण याने वादग्रस्‍त वक्‍तव्‍य करुन मुस्‍लीम समाजाच्‍या भावना भडकवल्‍या आहे. सदर कृत्‍य मुस्‍लीम विरोधी असुन मुस्‍लीम समाजाचे सुफी संत हजरत ख्‍वाजा मोईनोद्‍दीन चिश्‍ती यांच्‍याबद्‍दल वादग्रस्‍त व चुकीचे वक्‍तव्‍य करणा-या अमीश देवगण विरूध्‍द धार्मिक भावना दुखावल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात यावा,न्‍युज 18 इंडिया या चॅनलवर कायमस्‍वरूपी बंदी करावी,तसेच सर्व चॅनलवर कुठल्‍याही धार्मिक डिबेटवर बंदी घालण्‍यात यावी अशा मागण्‍या प्रांत रामसिंग सुलाणे यांच्‍याकडे एका निवेदनाद्‍वारे करण्‍यात आली.
यावेळी मा.नगरसेवक शेख पापा शेख कालू,धर्मगुरु मोहंमद कमरूद्‍दीन रजवी,मोहंमद अखलाक र दशजवी,सैय्‍यद अख्‍तर आली रजवी,सैय्‍यद नुरआलम अशरफी,हाफीज रईस शाह नक्‍शबंदी,शफीउज्‍जम शाह,शेख इमरान शेख पापा,असलम मासुम शाह,मुश्‍ताक शेख अहमद,जावेद शेख अहमद,घमा दगडू पिंजारी,फारूक सुभान शाह,शेख जाकीर जफर,अशफाक अशरफ हुसेन,शकील गुलाब शाह,एजाज मुस्‍तफा खान,आशिक अली अ.सलाम,याकुब महेबुब गवली अन्‍वर नुर मोहंमद उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *