भुसावळच्या कल्पना कोल्हे बेस्ट अभिनेत्री ; ऑनलाइन अभिनय स्पर्धेत तृतीय क्रमांकाने सन्मानित ;


भुसावळ (प्रतिनिधी )- मुंबई येथे
छत्रपती शिवाजी महाराज एंटरटेनमेंट प्रस्तुत ॐ भव्य ऑनलाइन अभिनय स्पर्धा 2020 या स्पर्धेत भुसावळच्या नाट्य व सिने कलाकार कल्पना कोल्हे यांनी बेस्ट अभिनेत्री ऑनलाइन अभिनय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकवला आहे . या यशाबद्दल कल्पना कोल्हे यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
छत्रपती शिवाजी महाराज एंटरटेनमेंट प्रस्तुत ॐ भव्य ऑनलाइन अभिनय स्पर्धा 2020
स्मिता पाटील अभिनेत्री जैत रे जैत चित्रपटातील स्त्री पात्र सिन डायलॉग अभिनय स्पर्धेत भुसावळ येथील नाट्य व सिनेकलाकार कल्पना कोल्हे यांनी नियमावली नुसार
उत्कृष्ट बेस्ट अभिनेत्री परफॉमन्स तृतीय क्रमांक चा मान पटकावला
आहे . याबद्दल समूहातर्फे प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले
आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी सर्व कलाकरांनी या मंचावरती
आपली कला सादर केली त्या बद्दल छत्रपती शिवाजी महाराज
एंटरटेनमेंट प्रोडक्शन तर्फे सन्मानपत्र देण्यात येवून अभिनंदन करण्यात आले आहे . तसेच या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *